New Income tax regime home loan नवीन कर प्रणालीमध्ये गृहकर्ज व्याजाचा फायदा आहे काय?
जुन्या करप्रणालीत गृहकर्जाच्या व्याजावर वजावट मिळते, ज्यामुळे करदात्याचे करपात्र उत्पन्न कमी होते. मात्र, नवीन करप्रणालीत (कलम ११५बीएसी) स्व-व्याप्त घराच्या मालमत्तेचे आर्थिक नुकसान इतर उत्पन्नातून सेट-ऑफ करता येत नाही. भाड्याने दिलेल्या घराच्या व्याजावर मात्र वजावट मिळते. त्यामुळे करदात्याने जुन्या प्रणालीतून नवीन प्रणालीत संक्रमण केल्यास स्व-व्याप्त घराच्या नुकसानीचा दावा करता येणार नाही.