New GST Rate बचतोत्सवाला सुरुवात: दरकपातीमुळे कुटुंबाच्या घरखर्चाला मिळणार बळ; पण कसे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'जीएसटी बचतोत्सव'ची घोषणा केली. जीएसटी २.० अंतर्गत २२ सप्टेंबरपासून ३७५ हून अधिक वस्तूंवरील कर कमी करण्यात आले आहेत. अन्नधान्य, एफएमसीजी, सिमेंट, विमा, घरगुती उपकरणे आणि मोटारगाड्यांच्या किमती कमी झाल्या आहेत. या दरकपातीमुळे महागाईचा भार कमी होईल आणि ग्राहकांच्या खर्चात बचत होईल. उद्योगक्षेत्राने या निर्णयाचे स्वागत केले असून, उत्पादनांच्या विक्रीत वाढ होण्याची अपेक्षा आहे.