Insurance Policy & GST विमा पॉलिसी व नूतनीकरणावर जीएसटी सूट कशी लागू होते?
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ५६ व्या जीएसटी परिषदेने वैयक्तिक आरोग्यविमा आणि आयुर्विमा हप्त्यावरील जीएसटी दर १८% वरून शून्यावर आणल्याने विमा ग्राहकांमध्ये समाधान आहे. मात्र, गट आरोग्य आणि आयुर्विमा पॉलिसींवर १८% कर लागू राहणार आहे. यामुळे कॉर्पोरेट आणि किरकोळ विमा पॉलिसींमध्ये फरक निर्माण होईल. विमा कंपन्यांना इनपुट क्रेडिट मिळणार नसल्याने प्रीमियम वाढवण्याची शक्यता आहे.