EMI वर घेतलेल्या मोबाइलचा हप्ता न भरल्यास फोन होणार लॉक
एनबीएफसीकडून महागडे फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेटसाठी कर्ज घेण्याचे प्रमाण वाढले असताना कर्ज बुडवण्याचे प्रमाणही वाढले आहे. यावर आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कर्जदारांनी हप्ते वेळेवर न भरल्यास मोबाइल फोन लॉक करण्याची तरतूद करण्याचा विचार करत आहे. ग्राहकांच्या संमतीशिवाय फोन लॉक केला जाणार नाही आणि वैयक्तिक डेटाशी छेडछाड होणार नाही. हा नियम लागू झाल्यास बजाज फायनान्स, डीएमआय फायनान्स, चोलामंडलम फायनान्स यांसारख्या कंपन्यांना फायदा होईल.