अबब! TCS च्या सीईओंचा पगार ऐकला का? १२ हजार कर्मचारी काढण्याच्या निर्णयावर टीका
टीसीएसने चालू आर्थिक वर्षात १२ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे आणि उर्वरित कर्मचाऱ्यांची पगारवाढ रोखली आहे. याचवेळी, टीसीएसचे सीईओ के. कृतिवासन यांचे कोट्यवधी रुपयांचे पॅकेज चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर सामान्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात असलेल्या दरीवर टीका होत आहे.