१० वी पास तरुणांसाठी केंद्रात नोकरीची मोठी संधी! महिना ६९ हजार पगार, कसा कराल अर्ज? वाचा
दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी केंद्रीय गुप्तचर विभागात नोकरीची मोठी संधी आहे. केंद्रीय गुप्तचर विभागाने या मोठ्या भरतीसंदर्भात एक अधिकृत परित्रक जारी केले आहे. ज्या अंतर्गत सिक्योरिटी असिस्टंट / एक्झिक्युटिव्ह पदाच्या ४९८७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया २६ जुलै २०२५ पासून सुरु झाली असून उमेदवार १७ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करु शकतात.