मोबाईल कव्हर विकणारा होणार डॉक्टर! दिवसा काम तर रात्री अभ्यास करून केली NEET उत्तीर्ण
NEET Success Story: जर जिद्द असेल तर परिस्थिती कशीही असो व्यक्ती आपलं ध्येय जरूर गाठते असं म्हणतात. झारखंडमधील जमशेदपूर येथील एका सामान्य कुटुंबातील रोहित कुमारने ही गोष्ट खरी करून दाखवली. आपल्या कठोर परिश्रम आणि समर्पणाने त्याने हे सिद्ध केलं की तुमच्या आयुष्यात कितीही समस्या आल्या तरी, जर तुमच्यात काहीतरी करण्याची इच्छा असेल आणि तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल.