हिंदी माध्यमाच्या मुलाने मारली बाजी, राजस्थानचा महेश कुमार बनला NEET चा टॉपर!
NEET Topper Mahesh Kumar Success Story: राजस्थानमधील एका छोट्याशा शहरात नोहार (हनुमानगड) येथे राहणारा महेश कुमार अनेकदा त्याच्या शाळेच्या मैदानात एकटाच बसायचा. त्याच्या हातात पुस्तके असायची, पण मनात गोंधळ असायचा. तो विचार करायचा, 'मी हे करू शकेन का? हिंदी माध्यमाचा मुलगा जेईई किंवा नीट सारखी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकेल का?'