१०० वर्षांपूर्वी भारत- चीनच्या उदयाची एका व्यंगचित्राने केली होती भविष्यवाणी
एक व्यंगचित्र १९२५ साली अमेरिकन राजकीय व्यंगचित्रकार रॉबर्ट बॉब माइनर यांनी काढले होते. हे व्यंगचित्र आता viral झाले असून त्याचीच चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. या व्यंगचित्राच्या माध्यमातून भारत आणि चीन भविष्यात महासत्ता ठरू शकतात, असं सूचित केलं गेलं होतं. आज, ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफवाढीच्या पार्श्वभूमीवर, जागतिक अर्थव्यवस्थेत भारत आणि चीनच्या वाढत्या प्रभावामुळे त्या व्यंगचित्राचा संदर्भ पुन्हा जिवंत झाला आहे.