तुरुंगातून सुटताच दोन दिवसांनी २३ वर्षीय आरोपीचा ८० वर्षीय महिलेवर बलात्कार
तमिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यात २३ वर्षीय गुन्हेगाराने तुरुंगातून सुटल्यावर दोनच दिवसांत ८० वर्षीय महिलेवर बलात्कार केला. आरोपी नशेत होता आणि पोलिसांवर हल्ला केल्यामुळे त्याच्या पायावर गोळी झाडावी लागली. या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे. विरोधकांनी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यावर टीका केली आहे.