गणपती विसर्जन मिरवणुकीत ट्रक घुसला, ९ जणांचा मृत्यू; भीषण अपघाताचा Video व्हायरल
कर्नाटकच्या हासन जिल्ह्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत भरधाव वेगात ट्रक घुसल्याने ९ जणांचा मृत्यू आणि २० हून अधिक जण जखमी झाले. गुरुवारी रात्री मोसालेहोसल्ली गावात हा अपघात झाला. आरोपी चालकाला अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर केली.