केरळमध्ये ‘ब्रेन इटिंग अमीबा’ खातोय आयुष्य; नेमका काय आहे हा आजार?
केरळमध्ये निपाह व्हायरसनंतर आता ब्रेन इटिंग अमीबा पसरत आहे. कोझिकोड जिल्ह्यात या आजारामुळे एका नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे आणि आणखी दोन रुग्ण संक्रमित झाले आहेत. ब्रेन इटिंग अमीबा म्हणजे अमीबिक इंसेफेलाइटिस, जो नेगलेरिया फाउलेरी अमीबामुळे होतो. दूषित पाणी नाकावाटे शरीरात गेल्यास हा आजार होतो. लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, उलटी, भ्रम, आणि कोमा यांचा समावेश आहे. आरोग्य विभागाने दूषित पाण्यापासून बचाव करण्याचा सल्ला दिला आहे.