‘आज तक’च्या अँकर अंजना ओम कश्यप यांच्याविरोधात गुन्हा दाखल, वाल्मिक समाजाची तक्रार
लुधियाना पोलिसांनी 'आज तक'च्या अंजना ओम कश्यप, इंडिया टूडेचे अरुण पुरी आणि इंडिया टूडे समुहाविरोधात वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय वाल्मिकी धर्म समाजाने (BHAVADHAS) तक्रार केली होती की त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संत वाल्मिकी यांच्याविषयी घृणास्पद टिप्पण्या केल्या होत्या. अंजना कश्यप यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.