ऑनलाइन गेममधून ब्रेनवॉश; आग्र्यातील धर्मांतराच्या रॅकेटचं पाकिस्तानशी कनेक्शन
उत्तर प्रदेशमधील आग्रा पोलिसांनी एका आंतरराष्ट्रीय धर्मांतर रॅकेटचा भांडाफोड केला आहे. या रॅकेटद्वारे भारतातील मुलींचे धर्म परिवर्तन करून त्यांचा संपर्क पाकिस्तानमधील लोकांशी केला जात होता. सोशल मीडिया, ऑनलाइन गेम्स आणि डार्क वेबद्वारे हे रॅकेट चालत होते. पोलिसांनी १४ जणांना अटक केली असून, पीडित मुलींनी पाकिस्तानमधील लोकांशी इस्लामवर चर्चा केल्याचे सांगितले आहे.