१८ दिवसांपूर्वी आईचं कर्करोगाने निधन, तर वडिलांचा विमान अपघातात मृत्यू
अहमदाबाद विमान अपघातात ६२ वर्षांच्या कांचन पटोलिया यांचा मुलगा अर्जुन याचा मृत्यू झाला. अर्जुन ब्रिटिश नागरिक होता आणि १८ दिवसांपूर्वी पत्नीच्या अंत्यसंस्कारांसाठी गुजरातला आला होता. अर्जुन आणि भारती यांना दोन मुली आहेत, ज्यांची आता काळजी कांचन यांना घ्यावी लागणार आहे. अर्जुनच्या मृत्यूने पटोलिया कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.