अहमदाबाद येथील विमान अपघातानंतर कुठल्या विमानांची उड्डाणं उशिराने? जाणून घ्या
गुजरातमधील अहमदाबाद येथील मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचं विमान कोसळलं आहे. २४२ प्रवासी आणि १४ क्रू सदस्य असलेल्या या विमानाने अहमदाबादवरून लंडनला उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच अपघात झाला. या दुर्घटनेमुळे विमान सेवा विस्कळीत झाली असून अनेक उड्डाणं उशिराने होत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना केंद्र सरकारकडून पूर्ण मदतीचं आश्वासन दिलं आहे.