एअर इंडियाचं विमान कोसळताच हॉस्टेलच्या इमारतीमधून विद्यार्थ्यांच्या उड्या, Video Viral
अहमदाबादमधील एअर इंडियाचे एआय-१७१ हे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाला आदळले. यात २४१ प्रवासी आणि ३० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या खिडकीतून उड्या मारून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. व्हायरल व्हिडीओमध्ये विद्यार्थी दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरून उडी मारताना दिसत आहेत.