अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाचं उड्डाण रद्द, संतप्त प्रवासी म्हणाले;”एअर इंडियाने..”
एअर इंडियाचं अहमदाबादहून लंडनला जाणारं विमान तांत्रिक बिघाडामुळे रद्द झालं आहे. १२ जून रोजी लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान कोसळून २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सहा दिवसांनी पुन्हा एकदा विमान रद्द झाल्याने प्रवासी संतापले आहेत. प्रवाशांनी विमान कंपनीवर नाराजी व्यक्त केली असून, त्यांना योग्य माहिती दिली जात नसल्याचं सांगितलं आहे.