अपघाताच्या व्हिडीओत दिसणाऱ्या राखाडी ठिपक्यात आहे दुर्घटनेचं कारण? तज्ज्ञांचा दावा!
अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या AI 171 विमानाच्या दुर्घटनेत २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. विमान उड्डाणानंतर अर्ध्या मिनिटात कोसळलं. अमेरिकन तज्ज्ञ स्टीव्ह शेबनर यांनी तीन कारणं मांडली: दोन्ही इंजिन फेल होणं, फ्लॅप सेटिंग्ज बिघडणं, आणि पायलटची चूक. शेबनर यांच्या मते, व्हिडीओतील राखाडी ठिपका म्हणजे RAT प्रणाली, जी इंजिन बिघाडाच्या स्थितीत कार्यान्वित होते. ब्लॅक बॉक्स तपासणीची प्रतीक्षा आहे.