“…तर ‘त्या’ महिलांना पोटगी मिळण्याचा अधिकार नाही”, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी जोडीदाराला पोटगी देता येणार नाही. भारतीय रेल्वेच्या गट 'अ' अधिकारी असलेल्या महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायालयाने हिंदू विवाह कायद्याच्या कलम २५ चा दाखला देत, आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या व्यक्तीला पोटगीची गरज नसल्याचे स्पष्ट केले.