जिममध्ये महिलांशी पुरुष ट्रेनरचं गैरवर्तन, न्यायालयाने व्यक्त केली चिंता; महिलांच्या…
अलाहाबाद उच्च न्यायालयाने जिममध्ये जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. एका पुरुष ट्रेनरने महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवणे आणि जातीआधारित टिप्पणी केल्याप्रकरणी न्यायालयाने टिप्पणी केली. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर आरोपी ट्रेनरने न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने महिलांच्या सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण टिप्पणी करत मीरत पोलिसांना जिमची नोंदणी आणि महिला ट्रेनर्सबाबत माहिती सादर करण्याचे आदेश दिले.