स्वातंत्र्यापासूनच्या आंदोलनांमागील हेतूंचा अभ्यास होणार; अमित शाह यांचे आदेश!
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातील आंदोलनांसाठी मार्गदर्शक नियमावली तयार करण्याचे आदेश पोलीस विभागाला दिले आहेत. ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट (BPR&D) कडे हे काम सोपवले असून १९७४ पासून झालेल्या आंदोलनांचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत. आंदोलनांमागील आर्थिक गणित आणि शक्तींचाही तपास केला जाणार आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत विशिष्ट पथक नियुक्त केले जाईल.