अमित शाह यांचं वक्तव्य; “ऑपरेशन महादेव राबवून पहलगाम हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा”
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत सांगितले की पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सुलेमान, अफगाण आणि जिब्रान हे तीन दहशतवादी लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मारले गेले. ऑपरेशन महादेव अंतर्गत २२ मे ते २२ जुलै दरम्यान ही कारवाई झाली. अमित शाह यांनी या यशाबद्दल सुरक्षा दलांचे आभार मानले.