एअर इंडियाच्या विमानात बसलेल्या महिलेनी दिली विमान पाडण्याची धमकी, पोलिसांकडून अटक
बंगळुरू विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात बसलेल्या महिला प्रवाशाने विमान पाडण्याची धमकी दिली. डॉक्टर व्यास हिरल मोहनभाई यांनी सामान योग्य ठिकाणी ठेवण्यावरून वाद घातला आणि केबिन क्रूला धमकी दिली. वैमानिकाने पोलिसांना कळवून त्यांना विमानातून उतरवले. त्यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.