घराच्या बाहेर चपला ठेवत असाल तर सावधान! चपलेत लपलेल्या सापाचा दंश, युवकाचा मृत्यू
बंगळुरूच्या बन्नेरघट्टा परिसरात ४१ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर मंजू प्रकाश यांचा क्रॉक्स चपलेत लपलेल्या सापाने चावा घेतल्यामुळे मृत्यू झाला. मंजू यांना अपघातामुळे पायातील संवेदना नष्ट झाल्याने सापाच्या चाव्याची जाणीव झाली नाही. कुटुंबियांनी साप बाहेर काढला, पण मंजू बेशुद्ध पडले होते. रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांचा मृत्यू झाला.