बंगळुरूत ओयो रुममध्ये ३३ वर्षीय विवाहितेची हत्या, २५ वर्षीय प्रियकराला अटक
कर्नाटक पोलिसांनी एका विवाहित महिलेची हत्या केल्याप्रकरणी तिच्या प्रियकराला अटक केली. मृत महिला हरिनी आर. (३३) आणि आरोपी यशस (२५) यांच्यात अनैतिक संबंध होते. हरिनीने हे नाते संपवण्याचा निर्णय घेतल्यावर यशसने तिला ठार केले. यशसने स्वतःच्या शरीरावरही वार करून आत्महत्येचा बनाव केला.