Video: “मोदीविरोधी असाल, तर…”, मुस्लिमांना उद्देशून भाजपा खासदाराचं विधान!
बिहार विधानसभा निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. ६ व ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून १४ नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील. भाजपाचे खासदार अशोक यादव यांनी मुस्लीम समुदायाविरोधात वादग्रस्त विधान केले आहे, ज्यामुळे विरोधकांनी भाजपावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप केला आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही मुस्लीम समुदायाबाबत वादग्रस्त विधान केले होते.