बिहारमध्ये कुणाला काय मिळणार? ‘या’ फॉर्म्युल्यावर एकमत? भाजपातून ‘समसमान’चा प्रस्ताव!
बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये एनडीएनं मोठं यश मिळवलं आहे. भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असून जदयूला ८५ जागा मिळाल्या आहेत. सत्तावाटपाबाबत भाजपाने समसमान वाटपाचा प्रस्ताव मांडला आहे. नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करण्यावर भाजपात एकमत झालं आहे. मंत्रीपदांच्या वाटपात भाजप व जदयूला समान संख्येत मंत्रीपदं मिळणार आहेत. उपमुख्यमंत्रीपदाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.