नर्सची डेडबॉडी नाही, रक्त नाही आणि डीएनएही नाही; यालाच म्हणतात का हा ‘परफेक्ट क्राईम’?
फ्रान्सच्या अल्बी शहरात सेद्रिक ज्युबिलारवर पत्नी डेल्फिनच्या खुनाचा खटला सुरू झाला आहे. २०२० मध्ये कोविड काळात डेल्फिन बेपत्ता झाली, पण तिचा मृतदेह सापडला नाही. सेद्रिकवर संशय वाढवणारे काही परिस्थितिजन्य पुरावे मिळाले आहेत, जसे की डेल्फिनचे तुटलेले चष्मे आणि मुलाची साक्ष आदी. तरीही, ठोस पुरावे नसल्याने खटला चर्चेचा विषय ठरला आहे. आहे का हा परफेक्ट क्राईम?