पहिल्यांदाच होणार डिजिटल जनगणना; तुमची माहिती ‘अशी’ केली जाईल गोळा, वाचा सविस्तर
करोनामुळे २०२१ साली होऊ न शकलेली जनगणना आता सुरू झाली आहे. यावेळी जातीसंदर्भातील माहिती गोळा केली जाणार असून, पहिल्यांदाच डिजिटल माध्यमांचा वापर होणार आहे. जनगणना दोन टप्प्यांत पूर्ण होईल, पहिला टप्पा २०२६ मध्ये आणि दुसरा २०२७ मध्ये. ३४ लाख कर्मचाऱ्यांना नियुक्त केले आहे. नागरिकांना स्वयंगणनेची सुविधा उपलब्ध आहे आणि प्रत्येक इमारतीचं जिओ-टॅगिंग केलं जाणार आहे.