‘मी गरीब आहे म्हणून १० हजारात स्वतःला विकू का?’, अंकिता भंडारीचं ‘ते’ चॅट ठरलं पुरावा
अंकिता भंडारी हत्या प्रकरणात भाजपाचे माजी नेते विनोद आर्य यांचा मुलगा पुलकित आर्य आणि इतर दोघांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. उत्तराखंडच्या पौरी गढवाल जिल्ह्यातील न्यायालयाने ४७ साक्षीदारांचे जबाब आणि व्हॉट्सॲप चॅट्सच्या पुराव्यांच्या आधारे हा निर्णय दिला.