हिंदू मुलींचे धर्मांतर करण्यासाठी छांगूर बाबानं तयार केली शेकडो मुस्लीम तरूणांची फौज
उत्तर प्रदेशमधील स्वयंघोषित धर्मगुरू छांगूर बाबा उर्फ जलालुद्दीन याने हिंदू मुलींचे धर्मांतर करण्यासाठी मुस्लीम तरुणांची फौज तयार केली होती, अशी माहिती समोर आली आहे. एटीएसने त्याला अटक केली आहे. त्याला ५०० कोटींचा विदेशी निधी मिळाल्याचा आरोप आहे. छांगूर बाबाची सहकारी नीतू हिलाही ताब्यात घेण्यात आले आहे.