Chinese Navy Fujian: फुजियान- चीनची तिसरी विमानवाहू युद्धनौका भारतासाठी ठरणार डोकेदुखी?
चीनने अलीकडेच तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' नौदलात समारंभपूर्वक दाखल केली. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या उपस्थितीत बीजिंगमध्ये हा सोहळा पार पडला. 'फुजियान' ही चीनची पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका आहे. या नौकेमुळे चीनने भारत, ब्रिटन आणि इटलीला मागे टाकले आहे. 'फुजियान'च्या अत्याधुनिक वैशिष्ट्यांमुळे चीनच्या सागरी सामर्थ्यात लक्षणीय वाढ झाली असून ती भारतासाठी डोकेदुखी ठरेल, अशी चिन्हे आहेत.