“माझ्या खोलीत ये तुला…”; स्वामी चैतन्यानंद विद्यार्थिनींना काय मेसेज करायचा?
दिल्लीतील स्वामी चैतन्यानंद उर्फ पार्थसारथी या स्वयंघोषित बाबाने विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा पर्दाफाश झाला आहे. १७ विद्यार्थिनींनी त्याच्यावर अश्लील मेसेज आणि लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. पोलिसांनी त्याच्या मोबाइलवरून ५० महिलांना पाठवलेले अश्लील मेसेज रिट्राइव्ह केले आहेत. चैतन्यानंद सरस्वती श्री शारदा इन्स्टिट्युट ऑफ इंडियन मॅनेजमेंटचा संचालक आहे. २००९ आणि २०१६ मध्येही त्याच्यावर लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल झाले होते.