पत्नीने ‘वैवाहिक जवळीक’ नाकारली, लेकाला दूर ठेवलं; पतीचा घटस्फोट मंजूर
वैवाहिक जवळीक नाकारणं आणि मुलाला जोडीदारापासून दूर ठेवणं हा मानसिक अत्याचार आणि क्रूरता असल्याचा निर्णय देत दिल्ली उच्च न्यायालयाने पतीला घटस्फोट मंजूर केला. पत्नीने सहजीवनास नकार, वारंवार घर सोडणं, तक्रारी दाखल करणं, मुलाला दूर ठेवणं आणि सासरच्यांविषयी असंवेदनशीलता दाखवणं ही मानसिक अत्याचाराची ठोस उदाहरण असल्याचं न्यायालयानं म्हटलं.