ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब; भारतात कुठल्या ५ क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसणार? वाचा यादी!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ आणि अतिरिक्त निर्बंध लागू केले आहेत. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी Truth Social वर पोस्टद्वारे भारताच्या उच्च टॅरिफ दरांवर टीका केली आहे. या निर्णयामुळे स्मार्टफोन, पेट्रोलियम उत्पादने, मौल्यवान हिरे व दागिने, औषधे आणि टेक्स्टाईल क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.