डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, “इराणने आता शांत बसावं नाही तर भीषण…”
अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फानमधील अणु प्रकल्पांवर हल्ले केले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा देत शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे, अन्यथा आणखी भीषण हल्ल्यांचा सामना करावा लागेल असे सांगितले. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी ट्रम्प यांच्या निर्णयाचे स्वागत केले आणि हा निर्णय इतिहास बदलणारा असल्याचे म्हटले. इराणने हल्ल्यांची कबुली दिली आहे.