डोनाल्ड ट्रम्प यांचा AI व्हिडीओ वापरून कर्नाटकमध्ये २०० लोकांची फसवणूक; कोट्यवधींची लूट
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एआयने तयार केलेला व्हिडीओ वापरून कर्नाटकमधील अनेक शहरांमध्ये फसवणूक झाली आहे. ट्रम्प यांच्या हॉटेल व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून २०० हून अधिक लोकांची फसवणूक करण्यात आली. बंगळुरू, तुमकुरू, मंगळुरू आणि हवेरी येथे सायबर चोरीच्या अनेक प्रकरणांची नोंद झाली आहे.