डोनाल्ड ट्रम्प यांचं ‘टॅरिफ वॉर’ स्थगित; अमेरिकन कोर्टानं फटकारलं, निर्णय ठरला घटनाविरोधी!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येताच विविध देशांवर टॅरिफ लागू केले, ज्यामुळे अनेक देशांशी तणाव निर्माण झाला. चीनवर २००% पेक्षा जास्त टॅरिफ लादले. ट्रम्प यांनी हे अमेरिकन नागरिकांच्या हितासाठी केले असल्याचा दावा केला. मात्र, 'यूएस कोर्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड'ने हे निर्णय घटनाविरोधी ठरवून स्थगिती दिली. न्यायालयाने ट्रम्प प्रशासनावर अधिकारांच्या कक्षेबाहेर जाऊन निर्णय घेतल्याचा आरोप केला.