‘माय फ्रेंड मोदी’ म्हणणाऱ्या ट्रम्प यांची पाकशी जवळीक; शरीफ यांच्याशी बंद दाराआड चर्चा!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्री असूनही, सध्या टॅरिफबाबत ट्रम्प यांनी घेतलेल्या भारतविरोधी भूमिकेमुळे तणाव निर्माण झाला आहे. दुसरीकडे, ट्रम्प पाकिस्तानशी सख्य वाढवत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुखांनी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. पाकिस्तानशी व्यापारविषयक करार आणि रशियाशी जवळीक वाढू नये म्हणून ट्रम्प पाकिस्तानला चुचकारत असल्याचे दिसते.