स्वप्नात झाले ट्रम्प देवाचे दर्शन म्हणून उभारले मंदिर; ५०% टॅरिफवाला देव पावणार का?
कधी कधी साध्यासुध्या, लहानशा खेड्यांतही अचंबित करणाऱ्या कथा दडलेल्या असतात. तेलंगणातील ही गोष्ट त्यापैकीच एक. मात्र, इथलं हे देवस्थान कुठल्याही पारंपरिक देवतेसाठी नसून, हजारो किलोमीटर दूर राहणाऱ्या एका व्यक्तीसाठी आहे. शेतकरी बुस्सा कृष्ण यांनी २०१८ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना स्वप्नात पाहिलं आणि त्यानंतर त्यांच्या प्रती अढळ श्रद्धा जोपासत, स्वतःचं पूजाघर मंदिरात रूपांतरित केलं. त्यांनी ट्रम्प यांचा फोटो प्रतिष्ठापित करून रोज पूजन करण्यास सुरुवात केली.