“…तर गाझामध्ये घुसून प्रत्येक हमास सदस्याला ठार करू”, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
इस्रायल आणि हमासमध्ये दोन वर्षांपासून चालू असलेलं युद्ध अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर थांबलं होतं. हमासने ओलीस नागरिकांना मुक्त केलं, पण काही पॅलेस्टिनी नागरिकांचा बळी घेतला. यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला कठोर इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी गाझामध्ये हमासच्या जवानांना ठार करण्याची धमकी दिली आहे. तर, अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स यांनी गाझामध्ये सैन्य उतरण्याची योजना नसल्याचं स्पष्ट केलं आहे.