Video: डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला इशारा, म्हणाले, “जर…”
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या टॅरिफ वॉरमुळे जागतिक स्तरावर परिणाम दिसत आहेत. अमेरिकेतही अनेक उद्योगांनी या धोरणाचा विरोध केला आहे. भारताशी व्यापार कराराबाबत बोलणी चालू असताना, ट्रम्प यांनी भारताला २५ टक्के व्यापार कर लागू करण्याचा इशारा दिला आहे. या विधानामुळे चर्चेत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांनी भारताशी अधिक व्यापक चर्चा करण्याची गरज व्यक्त केली आहे.