डोनाल्ड ट्रम्प यांचा रशियाला इशारा, “युक्रेनबरोबर सुरु असलेलं युद्ध थांबवा, अन्यथा…”
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला युक्रेनविरोधातील युद्ध थांबवण्याचा कठोर इशारा दिला आहे. केनडी सेंटरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी सांगितले की, जर रशियाने युद्ध थांबवले नाही तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. हे परिणाम टॅरिफपासून कठोर निर्बंधांपर्यंत असू शकतात. १५ ऑगस्टला अलास्कामध्ये ट्रम्प आणि पुतिन यांची बैठक होणार आहे.