२९८ लोकांचा जीव घेणार्या अपघातासाठी रशियाच जबाबदार; आंतरराष्ट्रीय न्यायालयानं ठरवलं दोषी!
युरोपच्या सर्वोच्च मानवाधिकार न्यायालयाने रशियाला २०१४ मध्ये मलेशिया एअरलाइन्सचे एमएच१७ विमान पाडल्याप्रकरणी आणि युक्रेनमध्ये युद्धादरम्यान मानवा अधिकारांचे उल्लंघन केल्याबद्दल जबाबदार धरले आहे. न्यायालयाने युक्रेन आणि नेदरलँड यांच्या बाजूने निकाल दिला असून, रशियाने फुटीरतावादी बंडखोरांना मदत केल्याचे निष्कर्ष काढले आहेत. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय दबाव वाढेल, जरी न्यायालयाला अंमलबजावणीचा अधिकार नसला तरी.