‘सर्व हिंदूंना अमेरिकेतून बाहेर काढा’, दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यामुळे काश पटेल ट्रोल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश पटेल यांना फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) संचालकपदी नियुक्त केले होते. दिवाळीच्या शुभेच्छा देणारी पोस्ट एक्सवर शेअर केल्यानंतर पटेल यांना अमेरिकेत द्वेषाचा सामना करावा लागला. काहींनी हिंदू उत्सवांवर टीका केली, तर काहींनी अमेरिकेत विदेशी उत्सवांना प्रोत्साहन देऊ नये असे म्हटले.