Model Murder : गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला मॉडेलचा मृतदेह, पोलिसांकडून हल्लेखोरांचा तपास सुरु
हरियाणातील सोनिपत येथे शीतल नावाच्या मॉडेलचा गळा चिरलेला मृतदेह आढळला. शीतल हरियाणवी संगीत विश्वात कार्यरत होती. काही दिवसांपूर्वी ती बेपत्ता झाली होती. पोलिसांनी तिचा शोध घेतला असता, खांडा गावाजवळील कालव्यापाशी तिचा मृतदेह सापडला. शीतलच्या कुटुंबीयांनी हत्येचा तपास करण्याची मागणी केली आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.