ब्राह्मण असल्याचं भासवत केलं लग्न , नवऱ्याच्या घरी जाताच विवाहिता म्हणाली ‘या अल्लाह!’
मी ब्राह्मण आहे आणि अविवाहित आहे असं एका मुलीने तरुणाला सांगितलं. ज्यानंतर या दोघांनी लग्न केलं. मात्र घरी आल्यानंतर ही मुलगी मुस्लिम असल्याची घटना उघड झाली. या मुलीने तिचं नाव निकिता असल्याचं सांगितलं होतं. पण तिचं खरं नाव नाजिया आहे आणि ती पाच वर्षांच्या मुलाची आई आहे ही बाब उघडकीस आली. यानंतर नाजियाने घरातले अडीच लाख रुपये घेऊन पळ काढला. सदर प्रकरणात पोलीस तक्रार करण्यात आली आहे.