शेकडो वर्षांपूर्वीची ‘ती’ घटना आणि गाव अजूनही साजरी करत नाही दिवाळी; सणासुदीचा गावात अंधार
हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील सामू गावात दिवाळी साजरी केली जात नाही. शेकडो वर्षांपूर्वी एका गर्भवती महिलेने पतीच्या चितेवर सती जाण्यापूर्वी गावाला शाप दिला होता. त्यामुळे गावकरी दिवाळीच्या दिवशी फटाके वाजवत नाहीत, रोषणाई करत नाहीत. शापामुळे दिवाळी साजरी केल्यास विपरीत परिणाम होतात, अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी गावात सामसूम असते.