“आम्हाला वाटलं आम्ही जिवंत परतणार नाही” इराणहून आलेल्या विद्यार्थ्यांनी काय सांगितलं?
इराण-इस्रायल संघर्ष तीव्र होत असताना ऑपरेशन सिंधु अंतर्गत ८२७ भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना इराणमधून भारतात आणण्यात आलं आहे. २१ वर्षीय मरिया मंझूरने सांगितलं की ती इराणमध्ये MBBS करत होती आणि तिथली परिस्थिती भयंकर होती. फातिमा अलवारीनेही हल्ल्यांचे भयावह अनुभव सांगितले. निखत बेगम आणि सोहेल कादरी यांनी त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली. दुतावासाच्या सहकार्यामुळे भारतीय विद्यार्थी सुखरूप परतले.